PHOTOS : ‘पृथ्वीचं फुफ्फुस’ असलेलं अमेझॉनचं जंगल एकटं जगाला 20 टक्के ऑक्सिजन देतं, जाणून घ्या 10 फॅक्ट्स
जगातील सर्वात मोठ्या जंगलापैकी एक जंगल म्हणजे दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनचं जंगल (Amazon Rainforest). हे जंगल प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेलं आहे.
दक्षिण अमेरिकेत असलेल्या अमेझॉन जंगलाच्या सीमा तब्बल 9 देशांना लागून आहे. यात ब्राझिल, बोलिविया, पेरु, इक्वॅडोर, कोलंबिया, वेनुझुएला, गुयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गुयानाचा समावेश आहे. या जंगलाचा 60 टक्के भाग ब्राझिलमध्ये आहे.
Follow us
जगातील सर्वात मोठ्या जंगलापैकी एक जंगल म्हणजे दक्षिण अमेरिकेतील अमेझॉनचं जंगल (Amazon Rainforest). हे जंगल प्रचंड मोठ्या भूभागावर पसरलेलं आहे. या जंगलात 25 लाख किड्यांच्या प्रजाती आहेत. याशिवाय हजारो प्रकारचे झाडं झुडपं आणि जवळपास 2000 पशु-पक्षी या जंगलात राहतात. अमेझॉनचं जंगल म्हणजे गुपितांचा खजाना आहे. यातील 10 महत्त्वाचे फॅक्ट्स.
अमेझॉन जगातील सर्वात मोठं उष्णकटिबंधीय जंगल आहे. ते 55 लाख चौरस किलोमीटरपेक्षा अधिक भागात पसरलेलं आहे. या जंगलाचा आकार ब्रिटन आणि आयर्लंडसारख्या देशांच्या 17 पट आहे. इतका मोठा आकार असल्यानेच हे जंगल जगातील 20 टक्के ऑक्सिजनची पुर्तता करतं.
दक्षिण अमेरिकेत असलेल्या अमेझॉन जंगलाच्या सीमा तब्बल 9 देशांना लागून आहे. यात ब्राझिल, बोलिविया, पेरु, इक्वॅडोर, कोलंबिया, वेनुझुएला, गुयाना, सुरिनाम आणि फ्रेंच गुयानाचा समावेश आहे. या जंगलाचा 60 टक्के भाग ब्राझिलमध्ये आहे.
या जंगलाच्या उत्तरेला अमेझॉन नदी (Amazon River) वाहते. ही नदी म्हणजे शेकडो पाण्याच्या प्रवाहांचं विस्तीर्ण जाळं आहे. या नदीचं जाळं तब्बल 6,840 किलोमीटरपर्यंत पसरलेलं आहे. असं असलं तरी यावरुन काही वादही आहेत. अनेक संशोधकांच्या मते सर्वात मोठी नदी नील नदी (Nile River) आहे आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची नदी अमेझॉन आहे.
2007 मध्ये मार्टिन स्ट्रेल नावाच्या एका व्यक्तीने संपूर्ण अमेझॉन नदी पोहून पूर्ण केली. यासाठी त्याला जवळपास 66 दिवसांपर्यंतचा वेळ लागला. दरदिवशी तो 10 तास पोहत होता.
अमेझॉनचं जंगल जवळपास 400-500 स्वदेशी अमेरिंडियन आदिवासी जमातींचं घर आहे. यातील 500 जमातींचा तर बाहेरच्या जगाशी कधीच संबंध आलेला नाही.
अमॅझेजनची स्वतःची एक विशाल आणि समृद्ध इकोसिस्टम आहे. येथे जवळपास 40 हजार वनस्पतींच्या प्रजाती, 1300 पक्ष्यांच्या प्रजाती, 3000 प्रकारचे मासे, 430 प्रकारचे स्तनधारी आणि 25 लाख प्रकारचे किटकं आहेत.
या जंगलात जगातील सर्वात धोकादायक प्राणीही राहतात. यात नदीत आढळणारी इलेक्ट्रिक ईल, मांस खाणारे पिरान्हा मासे, विषारी बेडकं, जॅगुआर आणि काही सर्वात जास्त विषारी साप यांचा समावेश आहे.
अमेझॉन जंगलात एक असा मासा आहे जो इतर माशांनाच फस्त करतो. त्याची लांबी जवळपास 3 मीटरपर्यंत असते. या माशाच्या तोंडात आणि जीभेवर दोन्ही ठिकाणी दात आहेत.
जागतिक हवामान बदलाला नियंत्रित करण्यात निसर्गाच्या संसाधनांनी समृद्ध या जंगलाचं सौदर्यही तेवढंच प्रेमात पाडणारं आहे. याशिवाय हे जंगल नैसर्गिक संतुलन ठेवण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका निभावते. कारण या जंगलातील वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड (एक ग्रीनहाऊस गॅस) घेतात आणि ऑक्सिजन सोडतात.
अमेझॉन जंगलात झाडांची इतकी दाटी आहे की बऱ्याच भागात प्रकाश किरणं देखील जमिनीवर पडत नाहीत. या ठिकाणी पूर्णवेळ अंधारच असतो. अशा ठिकाणी झाडांची इतकी दाटी असते की पाऊस झाला तरी पावसाचं पाणी जमिनीपर्यंत पोहचायला 10 मिनिटं वेळ लागतो.