आपली आकाशगंगा एका डिस्कप्रमाणे आहे. त्यात धूळ, ग्रह आणि तारे या सर्वांचा समावेश आहे. पृथ्वीचा समावेश असलेली सूर्यमाला आकाशगंगेच्या केंद्रापासून 26 हजार प्रकाशवर्ष दूर आहे. म्हणजेच जर त्या केंद्राजवळ जायचं ठरलं तर प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला तरी 26 हजार वर्षे लागतील. आकाशगंगेचा आकार आणि पृथ्वीपासूनचं अंतर इतकं जास्त आहे की ते मोजण्यासाठी सर्वसामान्य एककं वापरता येतंच नाहीत. यासाठी विशेष एकक आहे ते म्हणजे प्रकाशवर्ष. म्हणजेच एका प्रकाश किरणाला संबंधित अंतर पार करायला जितकी वर्षे लागतील तितकं ते अंतर.