भारतीय स्वयंपाकघरात हिंगाचे विशेष स्थान आहे. त्याच्या वापराने चव तर वाढतेच तसेच त्यात अनेक जादुई गुणधर्मही आहेत. त्याचे अनेक औषधी गुणधर्मही असून त्याच्या वापराने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. हिंगामध्ये कार्बोहायड्रेट्सचे फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे तुम्हाला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतात.
तुमचे पचन बिघडले असेल तर हिंगाचा वापर करू शकता. हिंगाचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हिंगाच्या पाण्याने पित्त आम्ल स्राव देखील वाढतो जे अन्न पचनात महत्वाची भूमिका बजावते. याच्या सेवनाने गॅस, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात.त्यामुळे पोट हलके राहून ते निरोगी राहण्यास मदत होते. यासाठी गरम पाण्यात हिंग विरघळवून त्याचे सेवन करावे.
हिंगाचे पाणी रक्तातील साखर (ब्लड शुगर) नियंत्रित करते. त्याचा हायपोग्लाइसेमिक प्रभाव आहे, जो रक्तातील साखर कमी करण्यासाठी ओळखला जातो. ब्लड शुगरच्या रुग्णाने हिंगाच्या पाण्याचे सेवन केल्यास त्याचा फायदा होतो.
हिंगाचे पाणी वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. हिंगामध्ये लठ्ठपणाविरोधी आणि चरबी कमी करणारे घटक असतात. त्याच्या मदतीने शरीराच्या वजनासोबत चरबीही कमी करता येते. हिंगचे पाणी प्यायल्याने मेटाबॉलिज्म चांगले राहते, त्यामुळे वजन कमी होते, तसेच इतर अनेक आजार सहज दूर होतात.
मासिक पाळीच्या दुखण्यामध्ये खूप वेदना होत असतील तर हिंगाचे पाणी प्यायल्याने बऱ्याच अंशी आराम मिळतो.
हिंगामध्ये अँटी इन्फ्लूएन्झा आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत, जे व्हायरल इन्फेक्शन रोखण्यासाठी कार्य करतात. सर्दी हा देखील एक प्रकारचा संसर्ग आहे. यामुळे हिवाळ्यात हिंगाचे पाणी पिणे गुणकारी मानले जा