Marathi News Photo gallery Know these causes of dark circle and you can try these home remedies to get rid of it
कमी झोप, फोनचा अत्याधिक वापर यामुळे वाढते डार्क सर्कलची समस्या, अशी करा दूर
डार्क सर्कल्स अर्थात डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याच सौंदर्य बिघडू शकते. डार्क सर्कलची समस्या कॉमन असून त्यामागे अनेक कारणं असू शकतात.
Follow us
डार्क सर्कल्सचा प्रॉब्लेम हा आपला लुक किंवा सौंदर्य खराब करू शकतो. डोळ्यांखालील काळया वर्तुळांपासून सुटका मिळवणे हे काही सोपे काम नाही. हे नक्की का होतं व त्यावर उपाय काय ते जाणून घेऊया.
झोपेची कमतरता : अनेक रिपोर्ट्समध्ये असे समोर आले आहे की, जर तुम्हाला कमी झोप घ्यायची सवय असेल तर डार्क सर्कलचा प्रॉब्लेम उद्बवतो. पुरेशी झोप न मिळाल्याने इतरही अनेक समस्या उद्भवू शकतात.
फोनचा अतीवापर : फोनशिवाय सामान्य जीवनाची कल्पना करणे आता सोपे नाही. फोन वापरणे हे प्रत्येक व्यक्तीला लागलेले एक प्रकारचे व्यसन झाले आहे. पण रात्रंदिवस स्क्रीन बघत वेळ घालवल्याने त्वचा निस्तेज दिसते.
चुकीचं खाणंपिणं : बिघडलेल्या जीवनशैली व्यतिरिक्त, चुकीचे खाणे-पिणे हे केवळ आपल्या आरोग्यालाच हानी पोहोचवत नाही तर त्यामुळे त्वचेचेही नुकसान होते. जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थांच्या सेवनाने त्वचा निस्तेज होते किंवा काळी पडते.
घरगुती उपाय : डोळ्यांखालची काळी वर्तुळ कमी करण्यासाठी तुम्ही काकडी किंवा बटाट्याचा रस वापरू शकता. त्यामध्ये असलेले गुणधर्म हे त्वचेची दुरूस्ती करतात आणि ती चमकदार होण्यास मदत मिळते.
कोरफड ठरते उपयोगी : डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीची देखील मदतघेऊ शकता. बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारी आणि जंतुनाशक गुणधर्मांनी परिपूर्ण कोरफड ही त्वचा बरी करण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)