बाया आळशी झाल्यात… बिनधास्त अन् बेधडक विधान करणारी सोनाली कुलकर्णी आहे तरी कोण?
Follow us
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मुलींबद्दल बरंच काही सांगितलं. पण त्यातील काही विधानांमुळे तिच्यावर टीका होत असून तिला आता पुढे येऊन माफीही मागावी लागली आहे. सोनाली कुलकर्णी ही एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
आजच्या महिलांबाबत सोनाली म्हणाली की, मुलींना अशा नवऱ्याची किंवा बॉयफ्रेंडची गरज असते जो चांगला कमावतो आणि त्यांचा सर्व खर्च उचलतो. ती स्वतः काय कमावणार? मुली आळशी झाल्या आहेत. याशिवाय तिने महिलांबद्दल बरीच काही विधाने केली असून त्यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल झाली. ल स्वतः एक महिला असून ती असे कसे बोलू शकते, असा प्रश्न लोकं विचारत आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)
मात्र, यावरून बरीच चर्चा सुरू असून वाद वाढत असल्याचे पाहून सोनालीने माफी मागितली असून एक पोस्टही शेअर केली आहे. खुलासा सादर केल्यानंतरही यासंदर्भातील ट्रोलिंग थांबलेले नाही. एकीकडे सोनालीचा मुद्दा काही लोतांना पटला आहे पण काही जण अजूनही त्यावरून टीका करत आहेत. इन्फ्लुएन्सर उर्फी जावेद हिनेही सोनालीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. आजच्या मुली घर आणि काम दोन्ही सांभाळतात, अशा परिस्थितीत त्यांना आळशी म्हणणे चुकीचे आहे, असे उर्फीने नमूद केले आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
अभिनेत्री असण्यासोबतच सोनाली कुलकर्णी एक मॉडेल देखील आहे. तिने विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोनालीने दिल चाहता है, मिशन काश्मीर, सिंघम आणि टॅक्सी क्र. 9211 अशा हिंदी चित्रपटांमध्ये तसेच दोघी, गंध, गुलाबजाम, यासह अनेक मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
अभिनयाच्या दुनियेत सोनाली सतत काम करत आहे. तिने साऊथच्या काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. मात्र स्ध्या ती महिलांसंदर्भात करण्यात आलेल्या या विधानामुळे चर्चेत असून तिच्यावर टीका होत आहे. सर्व महिलांना एकाच तराजूत तोलून तिने नवा पेच निर्माण केला आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)