24 कॅरेट गोल्ड प्रिंट साडीमध्ये उजळले क्रिती सॅननचे सौंदर्य, पहा फोटो
kriti Sanon Saree Look : क्रिती सेनन लवकरच आदिपुरुष या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचसाठी अभिनेत्री पोहोचली. यावेळी अभिनेत्रीने अतिशय सुंदर साडी नेसली होती. ज्याची खूप चर्चा होत आहे. जाणून घेऊया या साडीत काय खास आहे..
1 / 5
अभिनेत्री क्रिती सॅनन अलीकडेच आदिपुरुषच्या ट्रेलर लाँचला उपस्थित होती. यावेळी अभिनेत्रीने अतिशय सुंदर साडी नेसली होती. क्रिती सेनॉनचा हा साडीचा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
2 / 5
क्रिती सेननने ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केली होती. ही साडी अबू जानी संदीप खोसला यांनी कस्टमाईज केली आहे. या साडीला सोनेरी आणि लाल रंगाची बॉर्डर आहे.
3 / 5
या साडीवर खूप सुंदर प्रिंट आहे. या साडीवर 24 कॅरेट सोन्याच्या खादी ब्लॉक प्रिंट्स बनवण्यात आल्या आहेत. ज्यामुळे ही साडी आणखीनच मौल्यवान बनली आहे. या साडीचे फॅब्रिक केरळी कॉटन आहे.
4 / 5
ही साडी डबल ड्रेप आहे. या साडीसोबत एक अतिशय सुंदर ब्लाउज आहे. कॉपर कलरच्या या ब्लाउजवर फुलं आणि पाचूचे काम करण्यात आले आहे. क्रिती सेनॉनचा हा लूक खूपच आकर्षक ठरला. तिचे सौंदर्य पाहून सर्वांचे लक्ष तिच्याकडेच खिळले होते.
5 / 5
या साडीसोबत क्रितीने सुदर केशरचना केली होती. तिने केसांत पांढरी फुलं माळली होती. तसेच हातात गोल्डन ब्रेसलेट आणि स्टड कानातले घातले होते. कपाळावर टिकली आणि ब्राऊन आयशॅडो मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केला होता.