अभिनेत्री क्रिती सेनॉन सध्या कोरोना विरूद्ध लढाई लढत आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं तिनं सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं. त्यामुळे आता तिनं स्वत:ला आयसोलेटसुद्धा केलं आहे.
आयसोलेशनमध्ये असतानासुद्धा ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. ती सतत काही तरी पोस्ट करत चाहत्यांचं मनोरंजन करतेय.
आता तिनं स्वत:चे काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट आणि सुंदर दिसत आहे.
तिनं या फोटोशूटमध्ये शॉर्ट आणि ड्रेंडी ड्रेस परिधान केला आहे.
सोबतच मोकळे केस आणि मेकअपमुळे ती अजूनच खास दिसत आहे. क्रितीचा हा ग्लॅनरस अंदाज चाहत्यांचं मनं जिंकतोय.
क्रितीनं या फोटोला दिलेलं कॅप्शन कमाल आहे. 'मी नाजूक आणि मजबूत दोन्ही आहे. म्हणून काळजीपूर्वक हाताळा.' असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.