हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात (Kumbh Mela 2021) सोमवारी दुसरे शाही स्नान पार पडले.
यंदा कोरोनामुळे कुंभमेळ्याला नेहमीपेक्षा 50 टक्केच गर्दी झाली आहे. तरीही शाही स्नानापूर्वी अनेक साधू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. मात्र, त्यानंतरी शाही स्नानासाठी लोक गर्दी करताना दिसत आहेत.
सोमवती अमवस्येच्या निमित्ताने गंगेच्या वेगवेगळ्या घाटांवर सामान्य लोकांनीही मोठी गर्दी केली होती. सोमवारी सकाळी दहावाजेपर्यंत जवळपास 17 लाख 31 हजार लोकांनी शाहीस्नान केले.
जुना आखाड्याचे साधू गंगेत शाही स्नान करताना.
यानंतर वेगवेगळ्या आखाड्यातील साधुंनी शाही स्नानाचा आनंद लुटला.
एकीकडे देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना शाही स्नानासाठी झालेली गर्दी डोळे विस्फारुन टाकणारी होती.
उत्तराखंडमध्ये रविवारी कोरोनाचे 1,333 नवे रुग्ण आढळून आले. तर 8 जणांचा मृत्यू झाला. तर हरिद्वार येथे 400 कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले.