Photos | कुणाल खेमुचा खास ‘टायगर टॅटू’, तब्बल 30 तासांनी काढून पूर्ण
अभिनेता कुणाल खेमू आपल्या एक्सपेरिमेंटल स्टाईलसाठी ओळखला जातो. त्याला टॅटूज चांगलेच आवडतात.
Follow us
अभिनेता कुणाल खेमु आपल्या एक्सपेरिमेंटल स्टाईलसाठी ओळखला जातो. त्याला टॅटूज चांगलेच आवडतात.
नुकताच त्याने आपल्या पायावर एक नवा टॅटू काढला आहे. हा टॅटू एका वाघाचा आहे. कुणालसोबत मलंग चित्रपटात काम केलेली अभिनेत्री दिशा पटानी त्याच्या या टॅटूने चांगलीच प्रभावित झालेली पाहायला मिळाली.
कुणालने सोशल मीडियावर आपल्या टॅटूचा एक व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. यात त्याने आपल्या टॅटूची सविस्तर माहिती दिली आहे. कुणाल म्हणाला, की मी टॅटू 2016 मध्ये काढला होता. मात्र, आतापर्यंत मी कुणालाही हा टॅटू दाखवला नव्हता. कारण हा टॅटू पूर्णपणे काढून झाला नव्हता.
हा टॅटू काढायला जवळपास 30 तासांचा वेळ लागला आहे. त्यामुळे प्रत्येकी 6-6 तासांच्या शिफ्टमध्ये हा टॅटू काढवा लागला.
कुणालच्या या टॅटूला खूप वेळ लागला असला, तरी स्वतः कुणाल यावर खूप समाधानी आहे. दिशा पटानीने याला ‘शानदार’ म्हणत कौतुक केलं आहे.
कुणालच्या या पोस्टवर गजराज राव, दिया मिर्जा, शिखा तल्सानिया आणि रणविजयसारख्या स्टार्सने देखील प्रतिक्रिया देत कौतुक केलं आहे.
लूटकेस चित्रपटात कुणालसोबत गजराज राव, रणवीर शौरी आणि विजयराज पाहायला मिळाले होते. दुसरीकडे दिशा पटानी सलमान खानच्या राधे चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.