मराठी चित्रपटसृष्टीतील लाडकी आणि क्यूट जोडी म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर नुकतंच विवाह बंधनात अडकले आहेत.
24 जानेवारीला पुण्यातील ढेपे वाड्यात हा शाही विवाह सोहळा पार पडला.
लग्नानंतर आता सिद्धार्थ आणि मिताली त्यांच्या लग्नाची झलक सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना देत आहेत.
हळद, मेहेंदी, लग्न आणि रिसेप्शनच्या फोटोनंतर आता या दोघांनी संगीत सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मिताली आणि सिद्धार्थनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये हा फोटो लक्षवेधी ठरला आहे. या दोघांचं ‘डोरा’वर प्रचंड प्रेम आहे. संपूर्ण लग्नात डोरा एखाद्या कुटुंबियासारखी वावरली,