अभिनेता भूषण प्रधानचा वाढदिवस नुकताच पार पडला आहे. लॉकडाऊनमुळे त्याने हा वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं साजरा केला.
वाढदिवस साध्या पद्धतीनं साजरा केला असला तरी त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रपरिवारानं त्याचा हा दिवस खास बनवला.
त्याच्या मित्रांनी काही स्पेशल केक त्याच्या घरीच आणले. हे केक बघून भूषण अत्यंत खूश झाला होता. त्यानं सोशल मीडियावर हे केक चांगलेच फ्लॉन्ट केलेत.
भूषणच्या चाहत्यांना हे चांगलंच माहिती आहे की तो फिटनेस फ्रिक आहे आणि सोबतच उत्तम अभिनेतासुद्धा. त्यामुळे या स्पेशल केकनं त्याचा वाढदिवस अधिकच स्पेशल बनवला आहे.
या फोटोमध्ये तो प्रचंड खूश दिसत आहे. त्याचे हे फोटो त्याच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.