Mahabaleshwar | पावसाळ्याच्या आल्हाददायक वातवरणात ‘महाबळेश्वर’ला जाण्याचा प्लॅन करताय? मग, ‘या’ ठिकाणांना अवश्य भेट द्या!

महाबळेश्वर (Mahabaleshwar) हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून 1372 मीटर उंचीवर हे एक लोकप्रिय आणि सुंदर हिल स्टेशन आहे. हे शहर पुण्यापासून सुमारे 123 किमी अंतरावर आहे.

| Updated on: Aug 13, 2021 | 8:23 AM
महाबळेश्वर (Mahabaleshwar) हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. समुद्रसपाटीपासून 1372 मीटर उंचीवर हे एक लोकप्रिय आणि सुंदर हिल स्टेशन आहे. हे शहर पुण्यापासून सुमारे 123 किमी अंतरावर आहे. ब्रिटीश काळात महाबळेश्वर बॉम्बे प्रेसिडेन्सीची उन्हाळी राजधानी होती. इतिहासातील मनोरंजक माहितीसह, आपण येथे सुंदर निसर्गरम्य देखाव्यांचा आनंद देखील घेऊ शकता. जर, तुम्ही महाबळेश्वरला भेट देण्याचा विचार करत असाल, तर येथे अशी काही ठिकाणे आहेत ज्यांना तुम्ही अवश्य भेट दिलीच पाहिजेत.

1 / 6
मॅप्रो गार्डन : महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर महाबळेश्वरपासून 11 किमी अंतरावर स्थित, मॅप्रो गार्डन हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. हे ठिकाण विशेषतः स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे, परंतु त्यात विविध प्रकारचे चॉकलेट, स्क्वॅश आणि फळांचे क्रश आणि बरेच काही विक्रीसाठी उपलब्ध आहे. या मोठ्या बागेच्या आत एक चॉकलेट फॅक्टरी आहे, तसेच एक नर्सरी आहे. त्यात मोठ्या प्रमाणात वनस्पती आणि फुले आहेत. इस्टरच्या शनिवार व रविवार दरम्यान प्रसिद्ध स्ट्रॉबेरी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपण मार्च किंवा एप्रिलमध्ये या ठिकाणी भेट देण्याची योजना आखली पाहिजे.

2 / 6
लिंगमळा वॉटरफॉल पॉईंट : महाबळेश्वर बस स्टँडपासून 6 किमी अंतरावर स्थित, हा लिंगमळा धबधबा समुद्र सपाटीपासून 1278 मीटर उंचीवर आहे. एकदा तुम्ही मुख्य गेटवर पोहचल्यावर सुमारे 1.5 किमीचा ट्रेक आहे, जो तुम्हाला या नयनरम्य धबधब्याच्या दिशेने घेऊन जातो. हा धबधबा येथील निसर्गसौंदर्यामुळे महाबळेश्वरच्या आसपासच्या सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. आपण येथील लहान धबधब्याच्या आत पोहण्याचा आनंद देखील घेऊ शकता, परंतु मोठ्या धबधब्यात ते शक्य नाही.

3 / 6
वेण्णा तलाव : महाबळेश्वर बस स्टँडपासून 3 किलोमीटर अंतरावर वसलेले हे मानवनिर्मित तलाव सुमारे 28 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. त्याचा परिघ सुमारे 7 ते 8 किलोमीटर आहे. आजूबाजूच्या हिरवळ आणि नैसर्गिक सौंदर्यामुळे हे ठिकाण प्रत्येकासाठी रमणीय आहे. आपण या ठिकाणी बोटिंग आणि घोडेस्वारी सारख्या मनोरंजक उपक्रमांचा आनंद घेऊ शकता. लहान मुले येथे पार्क, टॉय ट्रेन इत्यादींचा आनंद घेऊ शकतात. आपली भूक भागवण्यासाठी, तलावाजवळ अनेक खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. हे ठिकाण कौटुंबिक सहलीसाठी अतिशय सुंदर आहे.

4 / 6
पाचगणी : महाबळेश्वरपासून 18 किलोमीटर आणि पुण्यापासून 104 किलोमीटर अंतरावर वसलेले, पाचगणी हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. हे एक अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे, कारण या ठिकाणी पर्यटकांसाठी अनेक आकर्षण बिंदू आहेत. या हिल स्टेशनच्या जवळच्या नदी बंधाऱ्यांना भेट देता येते. एखादी व्यक्ती येथील आसपासच्या छोट्या गावांना भेट देऊ शकतो, पौराणिक महत्त्व जाणून घेऊ शकतो आणि असे बरेच काही करू शकतो.

5 / 6
सनसेट पॉईंट : मुंबई पॉईंट म्हणूनही ओळखले जाणारे हे ठिकाण महाबळेश्वर बस स्टँडपासून 3 किमी अंतरावर आहे. येथे दिसणाऱ्या आकर्षक दृश्यांमुळे हे महाबळेश्वरच्या सर्वात लोकप्रिय व्ह्यू पॉईंटपैकी एक आहे.

6 / 6
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.