Health Care : उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहिचे असेल तर डिहायड्रेशन टाळा आणि या गोष्टींचा आहारात समावेश करा!
उन्हाळ्यात डिहायड्रेट झाल्यावर एक ग्लास उसाचा रस प्या. ते तुमची तहान तर भागवतेच पण तुमचा डिहायड्रेशन थकवा दूर करून तुम्हाला झटपट ऊर्जा देते. ताक पिणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ताक पिल्ल्याने आपले शरीर थंड राहते. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.