जगातील सर्वात शक्तिशाली मुकुट कोणता? असा प्रश्न विचारला तर त्यात पहिलं नाव येतं ते म्हणजे ब्रिटनच्या राणीचा मुकुट. या मुकुटावर कोहिनूर हिरा लावण्यात आलेला आहे. जेव्हा जगात बहुतांशी ठिकाणी ब्रिटीशांचं राज्य होतं. तेव्हा या मुकुटाला विशेष महत्व होतं.
ब्रिटिश राजघराण्याकडे आणखी एक खास मुकुट आहे. या मुकुटावर 10,000 हिरे लावण्यात आले आहेत. 'द गर्ल्स ऑफ द ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड' असं या मुकुटाचं नाव आहे. हा जगातील दुसरा सर्वात शक्तिशाली मुकुट मानला जातो.
जगातील तिसरा सर्वात शक्तिशाली मुकुट रोमन साम्राज्याचा मुकुट आहे. मौल्यवान हिरे या मुकुटावर पाहायला मिळतं. हिरे आणि रत्नांची सजावट या मुकुटावर पाहायला मिळते.हा मुकुट सध्या ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.
रशियन साम्राज्याचा मुकुट जगातील चौथा सर्वात शक्तिशाली मुकुट आहे. रशियन साम्राज्याच्या या मुकुटाला 'ग्रेट इम्पीरियल क्राउन' म्हणतात. हा मुकुट ज्यांच्या-ज्यांच्या डोक्यावर होता. त्या लोकांनी कोणत्याही अडथळ्यांविना राज्य केलं.
पाचव्या क्रमांकावर आहे, एका जुन्या गणराज्य देशाचा मुकुट. सम्राट चार्ल्स चतुर्थाच्या 700 व्या जयंतीनिमित्त प्रथमच हा मुकुट लोकांसमोर आणण्यात आला. दोन आठवड्यात हा मुकुट 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला.