रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. या सणामध्ये बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना (Prayer for health) करतात. भाऊ देखील आपल्या बहिणीच्या रक्षणाचे वचन घेतात. बहिणी कडून ओवाळणी केल्यावर भाऊ भेटवस्तू देतात. रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सर्वात मोठा सण (The biggest festival) असल्याने या निमित्ताने प्रत्येक बहिणीला सुंदर दिसावे असे वाटते. सणासुदीला बहिणीचा मान तो सर्वोच्च असतोच नवीन आणि सुंदर कपडे, मॅचिंग आणि ट्रेंडी ज्वेलरी घ्या. याशिवाय सुंदर दिसण्यासाठी मेकअप वर तासनतास खर्ची घातले जातात. पण परफेक्ट लूकसाठी स्टायलिश आउटफिट्स, ज्वेलरी आणि मेकअपसोबत ट्रेंडी हेअरस्टाइलही (Trendy hairstyles too) आवश्यक आहे. या रक्षाबंधनाला जर मुली पारंपारिक लुकचा अवलंब करत असतील तर त्या काही सोप्या आणि झटपट केशरचना करू शकतात. जाणून घ्या, काही सहज बनवता येण्याजोग्या स्टायलिश हेअरस्टाइल टिप्स.