सोशल मीडियावर दोघांच्या हेलिकॉप्टर वारीची चर्चा रंगल्यानंतर मॉस्कोतील कंपनीचा सीईओ असलेल्या विक्टर मार्टिनोव्हने व्हिडीओ शेअर केला. आम्ही ऑर्गेनिक फूडला कंटाळल्यामुळे क्रॅस्नोडारला गेलो, तिथे जाम धमाल केली, असं विक्टरने सांगितलं.
Follow us
हौसेला मोल नाही, हा वाक्प्रचार हातावर पोट असलेल्या गरीबांना नाही, मात्र अब्जाधींशांना सहज अंमलात आणता येतो. रशियातील अब्जाधीश उद्योगपतीनेही आपण ‘उंचे लोग उंची पसंद’ कॅटेगरीत असल्याचं दाखवून दिलं आहे.
450 किलोमीटर अंतरावर असलेल्या मॅकडोनल्ड्सच्या आऊटलेटमधून जाऊन आवडता बर्गर खाण्याची इच्छा झाल्याने विक्टर मार्टिनोव्ह (Viktor Martynov) साहेबांनी चक्क हेलिकॉप्टर बूक केलं. त्याची किंमत होती चक्क दोन लाख रुपयांच्या घरात.
33 वर्षांचा विक्टर मार्टिनोव्ह आपली गर्लफ्रेण्ड अलुष्टासोबत पूर्व युरोपात क्रिमियामध्ये सुट्टीवर गेला होता. मात्र स्थानिक फूड आऊटलेटमध्ये मिळालेल्या जेवणामुळे दोघांच्या तोंडाची चव बिघडली. त्यामुळे दोघांना मॅकडोनल्ड्सची आठवण झाली. (फोटो : क्रिमिया ट्रॅव्हल पोर्टल)
प्रायव्हेट हेलिकॉप्टर करुन विक्टर आणि अलुष्टा 450 किलोमीटर अंतरावर असलेल्या मॅकडोनल्ड्सला गेले. तिथे ऑर्डर केलेल्या बर्गर, फ्राईज आणि मिल्कशेकची किंमत 49 पाऊण्ड म्हणजे अंदाजे 4 हजार 866 रुपये झाली. हेलिकॉप्टरच्या रिटर्न प्रवासासाठी त्याला दोन हजार पाऊण्ड्स म्हणजेच 1 लाख 98 हजार 644 किंवा अंदाजे दोन लाख रुपये मोजावे लागले.