Health Care : उन्हाळ्यात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हे घरगुती उपाय करा आणि निरोगी राहा!
जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल आणि तरीही गोड खाण्याचे शौकीन असाल तर तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. कलिंगड खाल्ल्याने साखरेची पातळी वाढत नाही आणि शरीर हायड्रेट राहते. यामुळे उन्हाळ्याच्या हंगामात कलिंगडचा आहारात समावेश करा. तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल, मात्र आंब्याच्या पानांचे सेवन करूनही आपण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेऊ शकतो. आंब्याची पाने उकळवा आणि रात्रभर तसेच ठेवा.