मध: रात्रभर भिजवलेल्या बदामाच्या पेस्टमध्ये मध मिसळा आणि चेहऱ्यावर लावा, त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. थोडा वेळ ठेवल्यानंतर चेहऱ्यावर मसाज करा.
ओट्स : त्वचेची घाण दूर करण्यासाठी ओट्समध्ये दही मिसळा आणि चेहऱ्यावर स्क्रब म्हणून वापरा. डेड स्किन सेल्स काढण्यासाठी हे फायदेशीर आहे.
पपई : या घरगुती उपायाचा अवलंब केल्याने त्वचेच्या मृत पेशीच नाही तर टॅन देखील दूर करता येतात. पपई घ्या आणि मॅश केल्यानंतर चेहऱ्यावर लावा.
तांदूळ : तीन चमचे तांदळाचे पीठ घेऊन त्यात दोन चमचे गुलाबजल टाका. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावून एक्सफोलिएट करा. यामुळे चेहऱ्याला चांगली चमक येईल.
कच्चे दूध : यामुळे चेहरा हायड्रेट आणि मुलायम राहण्यास मदत होते. एका भांड्यात 4 ते 5 चमचे कच्चे दूध घ्या आणि त्यात एक चमचा रवा घाला. आता ही पेस्ट चेहऱ्यावर मसाज करा.(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)