Expensive Houses : ही आहेत देशातील सर्वात महागडी 5 घरं! मुकेश अंबानी यांचा ‘राजमहल’ कोणत्या स्थानी
Expensive Houses : भारताच्या आर्थिक राजधानीत देशातील सर्वात महागडी पाच टुमदार घरं आहेत. त्यात मुकेश अंबानी यांच्या ॲंटालियाचा कितवा क्रमांक लागतो.
नवी दिल्ली : भारतात श्रीमंतांची संख्या सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वी फोर्ब्सच्या 2023 मधील अब्जाधीशांच्या यादीत जगातील अब्जाधीशांची संख्या घटली असली तरी भारतात नव श्रीमंतांची संख्या वाढली आहे. भारतात या वर्षी 16 नवीन अब्जाधीश (Indian Billionaires) तयार झाले आहेत. हे श्रीमंत त्यांच्या श्रीमंतीमुळे सातत्याने चर्चेत आहेत. तर त्यांचे आलिशान इमले, मोठी घरे पण चर्चेत आहेत. देशातील पाच सर्वात महागडी घरे कोणती आहेत. ती कोणाची आहेत, जागतिक श्रीमंतांच्या यादीतील मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे आलिशान घर ॲंटालिया (Antilia) या यादीत कितव्या स्थानावर आहेत ते पाहुयात..
Antilia देशातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा ॲंटालिया हा राजमहल अग्रस्थानी आहे. ही 27 मजली इमारत आहे. या इमारतीची किंमत जवळपास 12,000 कोटी रुपये आहे. या इमारतीत अंबानी हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. या इमारतीच्या सहा फ्लोअरपर्यंत अंबानी कुटुंबियांच्या आलिशान कारसाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
जे के हाऊस भारतातील दुसरे सर्वात महागडे घर जेके हाऊस (JK House) आहे. यामध्ये भारतीय उद्योगपती गौतम सिंघानिया (Gautam Singhania) राहतात. रेमंड ग्रुपचे (Raymond Group) चेअरमन सिंघानिया हे या 30 मजली इमारतीत राहतात. या राजवाड्याची किंमत 6,000 कोटी रुपये आहे. यामध्ये स्विमींग पूल, स्पा, हेलीपॅड आणि जिमची व्यवस्था करण्यता आली आहे. या इमारतीत सर्व 5 स्टार सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत.
Abode देशातील तिसऱ्या सर्वात महागड्या घरांच्या यादीत अंबानी कुटुंबियांचं आलिशान घर येते. मुकेश अंबानी यांचे लहान बंधू अनिल अंबानी यांचे राहते घर एबोड (Anil Ambani Abode) हे भारतातील तिसरे महागडे घर आहे. या घराची अंदाजे किंमत 5,000 कोटी रुपये आहे. अनिल अंबानी यांचा हा महल 17 मजली आहे.
वृदांवन मुकेश अंबानी यांचे अत्यंत जवळचे, त्यांचे राईट हँड मनोज मोदी (Manoj Modi) यांच्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. परंतु, रिलायन्स समूहाच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या निर्णयात यांच्या शब्दाला महत्व आहे. मुकेश अंबानी यांनी ही 22 मजली इमारत त्यांना भेट म्हणून दिली आहे. या वास्तूची किंमत जवळपास 1,500 कोटी रुपये आहे. किंमतीच्या हिशोबाने हे भारतातील सर्वात महागडे घर आहे.
लिंकन हाऊस देशातील वॅक्सीन किंग म्हणून ओळखले जाणारे सायरस पुनावाला (Cyrus Poonawalla) यांचा राजमहल हा या यादीत पाचव्या स्थानी आहे. ही इमारत लिंकन हाऊस (Lincoln House) म्हणून ओळखली जाते. या घराची किंमत जवळपास 750 कोटी रुपये आहे.