राजेश्वरी मुळची पुण्यातली आहे. मराठी चित्रपटाचे आघाडीचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंनी तिला ज्यावेळी ‘फँड्री’ चित्रपटाची आॅफर दिली होती त्यावेळी तिने चित्रपट करण्यासाठी नकार दिला होता कारण त्यावेळी दहावीत शिकत होती. नागराज मंजुळेना फँड्री चित्रपटात जो चेहरा पाहिजे होता तो त्यांना राजेश्वरीच्या रूपाने मिळाला. राजेश्वरीने देखील आपल्या उत्तम अभिनयातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फँड्री शालूचे आताचे रूप पाहिले की चाहत्यांना विश्वासच बसत नाही.