बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. ती प्रचंड फिटनेस फ्रीक आहे त्यामुळे तिच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होते.
काही दिवसांपूर्वीच बॉयफ्रेन्डसोबत झालेल्या ब्रेकअपमुळे ती चर्चेत होती.
ब्रेकअपनंतर कृष्णानं एक बूमरँग व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडीओवर तिचा भाऊ म्हणजेच टायगर श्रॉफनं कमेंट केली आहे.
आता या कमेंटमुळे कृष्णा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. टायगरनं या व्हिडीओवर 'बोहोत मोटी लग रही हो' अशी कमेंट केली आहे.
कृष्णानं या व्हिडीओला कॅप्शनमध्ये 'लाल रंगात मी जाड दिसते का ?' असा प्रश्न केला आहे. त्यावर टागरनं 'खूप जाड' अशी कमेंट केली आहे.