विदर्भात सर्वात जास्त संत्र्याचे पीक घेतले जाते. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, वरुड हा भाग ओळखला जातो.
त्या भागात यावर्षी पावसाचा विलंब झाल्याने संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळांची गळती होते. जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यानंतर गायब झालेला पाऊस आता संथगतीने सुरु झाला आहे.
मात्र प्रशासनाकडून काहीच संत्रा बागेची पाहणी करण्यात आली पंचनामे देखील केले आहेत. मात्र अनेक संत्रा बागायतदार शेतकऱ्यांच्या शेतावर अधिकारी गेलेच नाहीत.
काही शेतकऱ्यांच्या पीकाचे पंचनामे न झाल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल? आमच्या गळ्यालेल्या संत्र्याची माती झाल्यावर पंचनामे करणार का असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.