Photo Gallery : हंगामाची सुरवात अन् शेवट सर्वकाही पाण्यातच, द्राक्ष उत्पादकांना सर्वाधिक फटका
नाशिक : निसर्गाचा लहरीपणा आणि द्राक्ष उत्पादकांनी त्याच्याशी केलेले दोन हात. आतापर्यंत शेतकऱ्यांनी सावरण्याचा प्रयत्न केला पण द्राक्षतोड होत असतानाही निसर्गाने द्राक्ष उत्पादकांवर कृपादृष्टी दाखवलेली नाही. अखेर नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. यापुर्वी अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे रोगराईचा प्रादुर्भाव नंतर वाढत्या थंडीतून बचाव व्हावा म्हणून रात्रीचा दिवस करुन द्राक्ष बागांमध्ये शेकोट्या हे सर्व करुन आता कुठे तोड सुरु असताना होत असलेल्या पावसामुळे द्राक्षांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. एकीकडे दर्जा खालावला म्हणून अपेक्षित दर नाही हे कमी म्हणून की काय आता होत असलेल्या पावसामुळे द्राक्ष विक्री होते की नाही याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे.
Most Read Stories