अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत या दोघांची जोडी रिल आणि रिअल लाइफमध्ये नेहमी चर्चेत असते.
'..आणि काय हवं ' या वेब सिरिजमधून प्रिया आणि उमेश यांची जोडी प्रेक्षकांच्या अजूनच पसंतीस उतरली.
हे परफेक्ट कपल नेहमी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतं. एकमेकांसोबतचे फोटो हे दोघंही शेअर करत असतात.
हे लाडकं कपल सध्या नवनवीन फोटोशूट करत सोशल मीडियावर शेअर करतंय.
'Hold on tonight..I'll follow you into the moonlight' असं कॅप्शन देत प्रियानं हे फोटो शेअर केले आहेत.