अंधेरी येथील गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर डिलाईल पुल 24 जुलै 2018 पासून गेली पाच वर्षे वाहतूकीसाठी बंद आहे.
या पुलाचे तीन जोड भाग असून दोन भाग पश्चिम बाजूला आहेत. या पुलावरुन वरळी, वरळी सी-लिंक एल्फिन्स्टन रोड जाता येत होते. आता लालबागने वळसा मारुन जावे लागते.
पश्चिम रेल्वेवरील लोअर परळ येथील डिलाईल रोडवरील ( ना.म.जोशी मार्ग ) ब्रिज रेल्वे अणि आयआयटी तज्ज्ञांनी धोकादायक ठरवून 2 फेब्रुवारी 2019 रोजी पाडण्यात आला होता.
लोअर परळ पुलाची ( डिलाईल रोड ) पुलाची पश्चिमेकडील मार्गिका गुरूवार 1 जूनपासून वाहनचालकांसाठी खुली केली आहे.
लोअर परळ पश्चिमेला सेनापती बापट मार्ग जंक्शन येथून येणाऱ्या गणपतराव कदम मार्गावरील उर्मी इस्टेट आणि पेनिनसुला कॉर्पोरेट पार्क येथून रेल्वे स्पॅनपर्यंतची मार्गिका 1 जूनपासून खुली झाली आहे.
उर्वरित टप्प्यात पूर्व दिशेचा पूल जुलै 2023 अखेरीस वाहतूकीसाठी संपूर्ण क्षमतेने खुला करण्याची पालिकेची योजना होती.
परंतू लोअर परळ पश्चिम रेल्वे रुळांकडचा पुलाचा भाग अजूनही जोडलेलाच नसल्याने हा पूल पुन्हा रखडणार आहे.
रेल्वेवरील भाग ओलांडण्यासाठी पादचारी यांच्या सुरक्षितेसाठी पूर्वीप्रमाणे पादचारी मार्गिका दिलेल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रेल्वेवरील भाग ओलांडण्यासाठी पादचारी यांच्या सुरक्षितेसाठी पूर्वीप्रमाणे पादचारी मार्गिका दिलेल्या नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या लोअर परळ पुलाचे 87 टक्के झाले आहे. उर्वरित काम जुलैपर्यंत होणार होते. परंतू त्यास पुन्हा उशीर होणार आहे.