सोशल मीडियावर मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीला 39.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर अभिनेत्री फक्त 192 नेटकऱ्यांना इन्स्टाग्रामवर फॉलो करते. ज्यामध्ये काही कुटुंबातील व्यक्ती आहेत. तर काही सेलिब्रिटी.
माधुरी दीक्षित इन्स्टाग्रामवर अभिनेत्री करीना कपूर खान हिला देखील फॉलो करते. पण करीना, माधुरीला फॉलो बॅक करत नाही. पण माधुरीची एक मोठी चूक चाहत्यांच्या नजरेस आली आहे.
माधुरी अभिनेत्री करीना कपूर हिला नाही तर, चुकीच्या अकाउंटला फॉलो करते आणि ही गोष्ट खुद्द माधुरी हिला देखील माहिती नसेल.
माधुरी बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित कामय तिच्या सौंदर्यामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असते. सध्या अभिनेत्री फोटोंमुळे चर्चेत आली आहे. पन्नाशीनंतर देखील माधुरीचं सौंदर्य कमी झालेलं नाही.