Marathi News Photo gallery Maharashtra Awarded by 6 Padma Awards including sindhutai sapkal girish prabhune parshuram gangavane Padma Bhushan award to Rajinikanth Devidas Shroff
महाराष्ट्राला 6 पद्म पुरस्कार प्रदान, रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण
देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांचे वितरण आज (9 नोव्हेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिध्द उद्योजक रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांच्यासह अन्य तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
1 / 7
नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांचे वितरण आज (9 नोव्हेंबर) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिध्द उद्योजक रजनीकांत देविदास श्रॉफ यांना पद्मभूषण तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, गिरीश प्रभुणे यांच्यासह अन्य तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
2 / 7
प्रसिध्द उद्योजक रजनीकांत देविदास श्रॉफ यांना व्यापार व उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पद्मभूषण हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नावाजलेली कृषी कंपनी ‘युनायटेड फॉस्फोरस’ चे श्रॉफ अध्यक्ष आहेत. ही कंपनी जगभरातील 130 देशांना उत्पादन निर्यात करते.
3 / 7
साहित्य व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानासाठी नामदेव कांबळे यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. कांबळे यांच्या आतापर्यंत 15 कादंबऱ्या आणि काही कथासंग्रही प्रकाशित झालेली आहेत. लिखाणातून सामाजिक एक्याचा संदेश त्यांनी दिलेला आहे. ‘राघववेळ’ या कांदबरीसाठी कांबळे यांना 1995 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कारही मिळालेला आहे.
4 / 7
व्यापार व उद्योगाक्षेत्रातील योगदानासाठी ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’ च्या सहसंस्थापिका जसवंतीबेन जमनादास पोपट यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. 1959 मध्ये सात गृहीणींनी आणि 80 रूपयांच्या भांडवलावर गृहउद्योग सुरू केला होता. आज या गृहउद्योगाचा वटवृक्ष निर्माण झालेला आहे.
5 / 7
कला क्षेत्रातील योगदानासाठी परशुराम आत्माराम गंगावणे यांना पद्मश्री प्रदान करण्यात आलेला आहे. परशुराम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील आहेत. जवळपास 500 वर्ष जूनी असलेली चित्रकथी ही लोककला जोपासण्याचे कार्य ते करीत आहेत. चित्रकथीच्या माध्यामातून समाजामध्ये ते जनजागृती व प्रबोधन करतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आज पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. चित्रकथीचे दस्तऐवजीकरण व संशोधन करण्याच्या हेतूने परशुराम गंगावणे यांनी ‘ठाकर आदिवासी कला आंगण’ या ठाकर कलाच्या संग्रहालयाची स्थापना केलेली आहे.
6 / 7
7 / 7
भटक्या विमुक्त समाजातील लोकांना आत्मभान देण्याचे कार्य गिरीश प्रभुणे मागील कित्येक वर्षांपासून करीत आहेत. यासह गुरूकुल परंपरेच्या माध्यमातून या समाजातील पारंपारिक कला जोपसण्याचे कार्यही प्रभुणे करीत आहेत. या त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षी एकूण 119 पद्मपुरस्कार जाहीर झाले होते. आज सकाळच्या आणि सायंकाळाच्या दोन टप्प्यांमध्ये एकूण 119 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले आहे. यामध्ये 7 पद्मविभूषण, 10 पद्मभूषण आणि एकूण 102 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये 29 महिलांचा समावेश आहे. 10 अप्रवासी भारतीय तसेच अन्य देशातील गणमान्य आहेत. यासह 16 मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार तर एका तृतीय पंथी व्यक्तिस हा मानाचा पुरस्कार आज प्रदान करण्यात आलेला आहे.