रात्रभर भंडाऱ्यात दमदार पाऊस झाला आहे, प्रशासनानं नदी काठावरील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सोमवारी रात्री भंडारा जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाला होता.
मंगळवारी सकाळपर्यंत सतत पाऊस सुरु आहे.
या दमदार पावसानं जिल्ह्यातील नदीनाले दुथडी भरून वाहू लागले आहेत.
या दमदार पावसानं शेतकरी सुखावला असून रोवणीला जोमानं सुरुवात झाली आहे.