PHOTO | काँग्रेसच्या कृषी कायद्यांविरोधातील स्वाक्षरी मोहिमेला राज्यात मोठा प्रतिसाद; 60 लाखांपेक्षा जास्त सह्या
महाराष्ट्र काँग्रेसने सुरु केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत राज्यातील ६० लाख शेतकरी, शेतमजूर, कामगार सहभागी झाले. त्यांच्या सह्यांचे निवेदन आज महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले. (Maharashtra Congress signature campaign against agriculture act)
Follow us
केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने 2 कोटी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे. महाराष्ट्रातून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
महाराष्ट्र काँग्रेसने सुरु केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत राज्यातील ६० लाख शेतकरी, शेतमजूर, कामगार सहभागी झाले. त्यांच्या सह्यांचे निवेदन आज महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील यांच्याकडे सोपवण्यात आले.
जुलमी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने देशव्यापी 2 कोटी सह्यांची मोहीम राबवण्याचे निश्चित केले होते, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
2 ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेल्या सह्यांच्या मोहिमेला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेसाठी गावपातळीपर्यंत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम केले.
मुंबई काँग्रेसतर्फे कृषी कायद्यांविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
“कृषी कायद्यांना तीव्र विरोध करत काँग्रेसने आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान किसान अधिकार दिवस, धरणे आंदोलन, राजभवन येथे जाऊन राज्यपालांना निवेदन तसेच महाव्हर्च्युअल किसान रॅलीच्या माध्यमातूनही भाजप सरकारच्या या अन्यायी कायद्याला विरोध केला.