राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात निर्बंध लागू करण्यात आले आहे. यामुळे अनेक स्थलांतरित मजुरांचे काम बंद झाले आहे. यामुळे अनेक परप्रांतीय मजुरांनी गावाकडची वाट धरली आहे.
मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिन्सजवळ उत्तर प्रदेश आणि बिहारला जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक मजुरांनी मुंबईतून परतीची वाट धरली आहे.
मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिन्स स्थानकात अनेक मजूर गावाकडे जाण्यासाठी निघाले आहे. यातील काही जणांना खासगी काम असल्याने ते गावी जात आहेत. तर काही लॉकडाऊनच्या भितीने जात आहेत.
मुंबईत हाताला काम नाही त्यामुळे आता गावीच थांबण्याचा या मजूरांचा निर्धार आहे. तर काहींनी परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मुंबईत परतू, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मात्र मजुरांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पाहायला मिळत आहेत.
तर दुसरीकडे नागपूरसह परिसरातील काही परप्रांतीय मजूरांचं स्थलांतर सुरु झालं आहे. काही भागात काम बंद, मंजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
नागपूरच्या रेल्वे स्थानकावर परप्रांतीय मजूर आप-आपल्या गावाला जाताना दिसत आहेत.