Photo | मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी, नगरमधल्या 350 शाळा सुरु
Follow us on
कोरोना संकट आणि लॉकडाऊमुळे बंद असलेल्या शाळा अखेर आजपासून (23 नोव्हेंबर) सुरु होत आहेत. ठाकरे सरकारने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज अखेर शाळेची दारं विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली . त्यानुसार नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून भरवण्यात येणार आहे.
अहमदनगरला आजपासून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशाने 9 ते 12 चे वर्ग सुरु करण्यात आलीये.
नगर जिल्ह्यात नववी ते बारावी मिळून तब्बल 1200 शाळा आहेत. मात्र 350 शाळा आजपासून सुरू होण्याच्या अंदाज आहे.
तसेच जिल्ह्यातील 1 लाख 84 हजार विदयार्थी संख्या असून जिल्ह्यात 10 हजार शिक्षक तसेच 6 कर्मचारी मिळून 16 हजार संख्या आहे.
विद्यार्थ्यांच्या स्वसंरक्षणासाठी सोशल डिस्टन्सिंग, टेंपरेचर चेकिंग, मास्क, सॅनिटाईझरची व्यवस्था करण्यात आलीये.