पावसाळा आता संपला आहे, पावसाचं संकट टळलं असं वाटत असतानाच आता पु्न्हा एकदा हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज राज्यातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावासाची शक्यता आहे.
हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार मुंबईमध्ये अंशत:ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. हलका पाऊस देखील पडू शकतो.
सांगलीमध्ये शुक्रवारी जोरदार पाऊस झाला.पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं. ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. दरम्यान आज देखील पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यत आहे.
विदर्भात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भातील काही भागांमध्ये आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो.
मराठवाड्यातील काही भागांमध्ये देखील आज पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये पुढील एक ते दोन दिवस वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात सध्या ढगाळ वातावरण असल्यामुळे अजूनही म्हणावी तशी थंडीमध्ये वाढ झालेली नाही. मात्र पुढील काही दिवसांमध्ये गारठा वाढण्याची शक्यता आहे.