पावसामुळे नद्यांना पूर आलेले असून कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अशातच रायगड जिल्ह्यामधील एक गाव पाण्याखाली गेलं आहे.
रायगड जिल्ह्यामधील आपटा हे गाव पाण्याखाली गेलेलं असून पाताळगंगा नदीला पूर आला आहे.
नदीशेजारी असलेल्या आपटा गावामध्ये पाणी शिरलं आहे.
नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होताना दिसत आहे. दोन दिवसांपासून गावात पाणी शिरलेलं आहे.
गावामधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
गावातील गणपती मंदिरात तरूण मुलांनी साकडं घातलं असून गणपती बाप्पाची आरती केली आहे.