गुलाल पडला अन् शरद पवारांचा हुकमी एक्का पिछाडीवर, धाकधूक वाढली

| Updated on: Jun 04, 2024 | 7:46 PM

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने पहिल्या फेऱ्यांमध्ये लीड घेतलेलं पाहायला मिळालं होतं. मात्र आता निकाल फिरू लागले असून असाच धक्का शरद पवार गटाच्या उमेदवाराला बसला आहे.

1 / 5
लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. मात्र कोणत्याही जागेचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. आघाडीवर-पिछाडीवर नेते जात असताना दिसत आहेत.

2 / 5
पश्चिम महाराष्ट्रामधील एका जागेवर शरद पवार गटाचे नेते आघाडीवर होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करत त्यांच्या अंगावर गुलाल उधळला. 

3 / 5
कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहामध्ये गुलाल उधळत जल्लोष केला. पण काही वेळासाठीच हा उत्साह पाहायला मिळाला. 

4 / 5
सातारा लोकसभा मतदार संघामधील शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर होते. मात्र आता ते पिछाडीवर पडले आहेत.

5 / 5
महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी विजय मिळवला असून शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला आहे. दुपारी आघाडीवर असलेल्या शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला होता. पण याचा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. दुसऱ्या फेरीनंतर उदयनराजेंनी मुसंडी मारली आणि विजय संपादित केला.