15 ऑगस्ट रोजी ऑटो सेक्टरमध्ये ऑफर्सची रेलचेल असेलच. पण या 78 व्या स्वातंत्र्यदिनी ही नवीन कार पण बाजारात दाखल होत आहे. बहुप्रतिक्षीत एसयु्व्ही 5-डोअर महिंद्रा थार लॉन्च होत आहे.
कंपनीने ही कार दोन नवीन रंगात सादर केली आहे. पांढरा आणि काळा अशा दोन रंगात ही कार दाखल होत आहे. कंपनी आता पर्यंत काळ्या रंगाचा वापर करत होती. आता पांढऱ्या रंगात थार न्हाऊन निघाली आहे.
कंपनीने याविषयीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात या कारमध्ये पॅनारॉमिक सनरूफ देण्याची माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी या एडिशनमध्ये पॅनॉरॉमिक सनरूफ देण्यात आला नव्हता. पॅनॉरॉमिक सनरूफ असणारी ही पहिली थार आहे.
यावेळी कंपनीने 5-डोअर थारमध्ये नवीन डिजिटल डिस्प्ले दिला आहे. पहिल्यांदाच थारमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. कार चालकाला त्याचा फायदा होईल.
या कारमध्ये टेक्नोसॅव्ही इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल. यामध्ये नॅव्हिगेशन सह इतर अनेक फीचर्स मिळतील. याशिवाय कारमध्ये सॉफ्ट लेदर डॅशबोर्ड मिळेल. त्यामुळे केबिन एकदम आलिशान वाटेल.
या कारमध्ये हरमन कार्डन म्युझिक सिस्टिम मिळेल. हरमनचा ऑडिओ साऊंड सिस्टिम त्याची गुणवत्ता आणि दर्जेदार साऊंड सिस्टिमसाठी ओळखल्या जातो