अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती नेहमी नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
आता तिनं तिच्या चाहत्यांना संक्रांतीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
'शुभ मकर-संक्राती ?'असं कॅप्शन देत तिनं हे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पूजानं काळ्या रंगाचा अतिशय साधा ड्रेस या फोटोमध्ये परिधान केला आहे. तरी पूजा यात कमालीची सुंदर दिसत आहे.
संक्रांतीच्या मुहूर्तावर काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे पूजानं देखिल हा काळा ड्रेस परिधान केला आहे.