फिट राहण्यासाठी तसेच उत्तम आरोग्यासाठी योगा करणं महत्वाचं आहे. दैनंदिन आयुष्यात योगाला अनन्यसाधारण महत्व आहे.
पडद्यावर झळकणारे अनेक कलाकारसुद्धा फिट राहण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी योगा करत असतात.
अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. ती नियमित जिम आणि योगा करते.
नुकतंच तिनं इन्स्टाग्रामवर योगा करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत.
विशेष म्हणजे ती सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या चाहत्यांना योगाचं महत्व समजावून सांगत आहे.
प्रत्येक आठवड्याला ती सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत योगाचं महत्व समजावून सांगते.