Maldives Crisis : मालदीवची स्थिती बिकट, आर्थिक घडी विस्कटली, मदतीसाठी भारताकडे पसरले हात
Maldives Crisis : मालदीवला आता भारताची किंमत कळून चुकली असेल. भारताशी पंगा घेणाऱ्या मालदीवचे वाईट दिवस सुरु झाले आहेत. मालदीवला आता पैशांसाठी भारताकडे हात पसरावे लागले आहेत. भारतानेही आपलं मोठ मन दाखवलय.
1 / 10
भारताशी पंगा घेणं मालदीवला खूपच महाग पडलं आहे. भारतीयांनी जेव्हापासून मालदीवला बॉयकॉट केलय, तेव्हापासून मालदीवला दर दिवशी कोट्यवधी रुपयांच नुकसान सहन करावं लागतय.
2 / 10
पर्यटक आणि पर्यटन हे मालदीवच्या कमाईचे मुख्य स्त्रोत आहेत. भारतीयांच्या मिशन बॉयकॉटमुळे त्यांचं मोठ नुकसान होतय. परिस्थिती संभाळण्यासाठी मालदीव वारंवार भारताकडे मदतीची मागणी करत आहे.
3 / 10
भारताने आतापर्यंत अनेकदा मालदीवची मदत केली आहे. आर्थिक संकटात फसलेल्या मालदीवसाठी पुन्हा एकदा भारताने मदतीचा हात पुढे केला आहे.
4 / 10
मालदीवच्या अर्थ मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेलं 5 कोटी अमेरिकी डॉलरच ट्रेजरी बिल स्टेट बँक ऑफ इंडियाने सब्सक्राइब केलय.
5 / 10
हे सब्सक्रिप्शन एक वर्षाच्या अवधीसाठी आहे. 19 सप्टेंबर 2024 पासून हा अवधी सुरु झालाय.
6 / 10
ट्रेजरी बिल्स सब्सक्राइब करण्याचा अर्थ आहे की, SBI मालदीव सरकारला एका निश्चित अवधीसाठी कर्ज देत आहे.
7 / 10
याआधी मे 2024 मध्ये SBI ने अशाच पद्धतीने मालदीव सरकारच्या विनंतीवरुन याच मॅकेनिज्म अंतर्गत 5 कोटी अमेरिकन डॉलर्सच बिल सब्सक्राइब केलं होतं.
8 / 10
आपातकालीन आर्थिक मदतीसाठी मालदीव सरकारच्या विनंतीवरुन हे सब्सक्रिप्शन करण्यात आलं होतं.
9 / 10
ट्रेजरी बिल्स सरकारने जारी केलेले शॉर्ट-टर्म डेट इंस्ट्रूमेंट्स असतात. शॉर्ट टर्म आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार या पैशांचा वापर करते.
10 / 10
मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर सध्या श्रीलंकेत आहेत. देश आर्थिक समस्यांचा सामना करतोय असं जमीर म्हणाले होते. त्यासाठी इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाची (IMF) मदत घेण्याची आवश्यकता नाहीय.