नुकतंच लग्न बंधनात अडकलेली अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवतीये.
नवनवीन फोटो व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते.
नुकतंच मानसीनं आता हिरव्या रंगाच्या साडीमध्ये नवं फोटोशूट केलं आहे.
एवढंच नाही तर तिनं तिच्या मांजरीसोबतही फोटोशूट केलं आहे.
या लूकमध्ये मानसी सुंदर दिसतेय. तिच्या गळ्यात असलेलं मंगळसूत्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
मानसी आणि प्रदीपच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हे दोघं एका गाण्यात झळकणार आहे. या गाण्यासाठी आता तिचे चाहते आता उत्सुक आहेत.