मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि उत्तम आयटम गर्ल म्हणजेच मानसी नाईक नुकतंच प्रदीप खरेरासोबत विवाहबंधनात अडकली आहे.
गेले अनेक दिवस ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या लग्नाची झलक चाहत्यांना देतेय.
तिच्या लग्नापूर्वी ती लग्नात कोणता लूक साकारणार या विषयावर चर्चा सुरू होती. तिच्या लग्नाचे फोटो समोर येताच तिनं जोधा- अकबर चित्रपटातील ऐश्वर्याचा लूक साकारल्याचं समोर आलं.
गेले अनेक दिवस तिच्या हळदीचे, मेहेंदीचे आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आता तिनं आणखी काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये ती सुंदर तर दिसतेय मात्र प्रचंड आनंदीसुद्धा दिसतेय.