अभिनेत्री सारा अली खान सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
सारा अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची मुलगी आहे.
सारानं 2018 मध्ये केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती अभिनेता सुशांत सिंह राजपूतसोबत झळकली.
आता सारानं एक सुंदर फोटोशूट केलं आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी हे कपडे डिझाइन केले आहेत. मनिष मल्होत्रा हे भारतातील प्रसिद्ध डिझायनर म्हणून ओळखले जातात.
सारा एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी जवळजवळ 50 ते 60 लाख रुपये चार्ज करते. सारा अनेकदा मनिष मल्होत्रा कलेक्शनसाठी फोटोशूट करते. आता तिनं ‘नुरानियत’या कलेक्शन साठी हे खास शूट केलं आहे.