सुनेत्रा पवार यांचा किरण मानेना फोन, या कारणामुळे एका क्षणात होकार दिला
महेश घोलप |
Updated on: Mar 15, 2023 | 11:27 AM
अजितदादांच्या पत्नी सुनेत्रावहिनींनी बारामतीमध्ये एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातनं पर्यावरणविषयक जागृतीचं अफाट काम केलंय ! एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटूंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं उत्तम उदाहरण आहे हे.
1 / 5
"किरणजी, मी बारामतीहून सुनेत्रा पवार बोलतीये. यावर्षी आमच्या फोरमच्या वर्धापनदिनादिवशी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून यावं अशी आम्हा सर्वांची मनापासून इच्छा आहे." फोरमचं काम मला माहित होतं. त्यामुळे एका क्षणात होकार दिला. मराठी अभिनेता किरण माने यांनी हे फेसबुकवरती तशी पोस्ट लिहिली आहे.
2 / 5
...अजितदादांच्या पत्नी सुनेत्रावहिनींनी बारामतीमध्ये एनव्हायरमेन्टल फोरमच्या माध्यमातनं पर्यावरणविषयक जागृतीचं अफाट काम केलंय ! एखाद्या राजकीय नेत्याच्या कुटूंबियांनी पदाचा, अधिकारांचा, आर्थिक सबलतेचा, जनाधाराचा, सामाजिक प्रतिष्ठेचा वापर समाजोपयोगी कामांसाठी कसा करावा, याचं उत्तम उदाहरण आहे हे.
3 / 5
कार्यक्रमादिवशी संवाद साधताना वहिनींचा निसर्ग, प्राणी, पक्षी, झाडं यावरचा सखोल अभ्यास पाहुन मी अक्षरश: थक्क झालो ! पर्यावरणशास्त्र, हवामानबदल, प्रदुषण, प्राणी-पक्षी याबद्दल सर्वांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये अवेअरनेस यावा यासाठी त्या अथक परीश्रम घेतात.
4 / 5
हल्ली मोबाईल गेम्समध्ये अडकलेल्या लहान मुलांना खुल्या मैदानात आणून लगोरी, सूरपारंब्या, गोट्या, विटीदांडू अशा अनेक लुप्त होत चाललेल्या खेळांच्या स्पर्धाही भरवल्या जातात. आजच्या बदललेल्या जीवनशैलीत खूप मोलाचं काम आहे हे. काल पर्यावरणप्रेमी अनुज खरे यांना 'वसुंधरा पुरस्कार' आणि विविध क्षेत्रात जगभर नांव कमावणार्या निवडक बारामतीकरांना 'बारामती आयकाॅन' पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं.
5 / 5
बारामती हे माझं जन्मगांव. कोर्हाळे बुद्रुक माझं आजोळ. माझ्यावर निरपेक्ष आणि अतोनात प्रेम करणारे, कुठल्याही संकटात माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे रहाणारे माझे मामा तानाजीबापू, नंदूआबा, तात्या आणि कुटूंबीय... सन्मित्र नितिन यादव, महादेव बालुगडे, अमोल काटे, ॲड.अमर महाडिक.. असे अनेक 'जिवातले गणगोत' बारामतीनं मला दिले.