'चंद्रा' फेम अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंची जोरदार चर्चा सुरु आहे.
'झलक दिखला जा' या कार्यक्रमातून अमृता खानविलकर ही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच कार्यक्रमासाठी अमृताने हे फोटोशूट केलं आहे.
अमृताने या फोटोमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा ब्लाउज घातला आहे. साडीमध्ये अमृता खूप सुंदर दिसत आहे.
तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी मेकअप आणि गळ्यात स्टोनची ज्वेलरी घातली आहे. तिचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
'चूड़ी की खन खन में वो हैं' असं कप्शन अमृताने फोटो शेअर करताना दिलं आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.