मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सतत सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचा प्रत्येक लूक हा चर्चेचा विषय असतो.
भाग्यश्री मोटे ही नेहमी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर करत असते.
अशातच तिच्या एकदम कडक चित्रपटाच्या चर्चेने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
एकदम कडक या चित्रपटातील 'मॅडम कडक हाय' या गाण्याने चाहत्यांना वेड लावलं आहे.
भाग्यश्रीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.