अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.
आता पूजानं मस्त साडीमध्ये एक फोटोशूट केलं आहे.
गुलाबी रंगाची साडी आणि गळ्यात सुंदर ज्वेलरी या अंदाजात पूजा कमालीची सुंदर दिसतेय.
नुकतंच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचा लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. या दरम्यान पूजासुद्धा या दिलकश अंदाजात दिसली.
‘Six yards of sheer elegance ?’असं कॅप्शन देत तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
एवढंच नाही तर पूजाचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.