आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमी चर्चेत असते.
महाराष्ट्रात तिचे लाखों चाहते आहेत. तिच्या सोशल मीडियावर सध्या नवनवीन फोटोंचा जणू पाऊसच पडतोय.
आता तिनं एका ज्वेलरी ब्रँडसाठी नवं फोटोशूट केलं आहे.
‘Highness’या ब्रँडसाठी तिनं हे खास फोटोशूट केलं.
प्रार्थनाला झी टीव्हीवरील 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही' 'व्हॉट्स अप लग्न' या चित्रपटांमध्ये तिनं कमालीचा अभिनय केला आहे. प्रार्थनाचं हे साधं आणि सोज्वळ रुप भूरळ पाडणारं आहे.