कपाळी चंद्रकोर, पदरावर नाचरा मोर...., असा मनमोहक लूक सोनालीने केला आहे.
सोनाली सोशल मीडियावर खुप सक्रीय असते, तिने नुकतेच सोशल मिडीयावर तिचे काही फोटो अपलोड केले आहेत
'मावळती चंद्रकोर ती रानफुलाने मोहित झाली निमुळत्या पाकळ्यांनी झुपके दवात भिजुन चंद्र प्याली' या चारोळीचं कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
काठ पदर साडी, कपाळी चंद्रकोर भारी, गळ्यात सौभाग्याची पोत काळी,शोभुनी दिसते यात सोनाली साजरी.... असचं काहीसं सोनालीचे हे फोटो पाहून वाटते आहे.
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनीही जी भरके लाइक्स, कमेंट चा अक्षरशः वर्षाव केला आहे. सोनालीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर भलतेच व्हायरल होऊ लागले आहेत