मास्टर ब्लास्टर सचिनने केले अफगाणिस्तानच्या टीमचे तोंडभरुन कौतूक, म्हणाला…’हा विजय तुमच्या….’
टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या टीमने इतिहास रचला आहे. या टीमने बांगलादेशला नमवून सेमी फायनलमध्ये धडाक्यात प्रवेश मिळविला आहे. बांगलादेशला हरविण्यापूर्वी या संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. बांगलादेशला हरवून त्याने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. त्याने बांगलादेशवर केवळ पराभव केला नाही तर चॅंम्पियन ऑस्ट्रेलियाला T20 विश्वचषकातूनच बाहेर काढले. 2021 च्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये देखील ऑस्ट्रेलियाला या टीमने पराभवाच्या टोकावर आणले होते. तर 2023 च्या वर्ल्डकपमध्ये या टीमने इंग्लंड हरवून सगळ्यांना धक्का दिला होता..याच वर्ल्ड कपमध्ये या संघाने श्रीलंका आणि पाकिस्तान देखील हरविण्याची कमाल केली होती. अफगाणिस्तान टीम दिवसेंदिवस प्रगती करीत असून क्रिकेटच्या देवाने देखील या टीमचे कौतूक केले आहे.
Most Read Stories