अभिनेत्री गौतमी देशपांडे नेहमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी सोशल मीडियाद्वारे कनेक्ट होते.
माझा होशील ना या मालिकेतून सध्या गौतमी घराघरा पोहोचली आहे.
याशिवाय गौतमी एक उत्तम गायिका आहे. मात्र ती सध्या आपल्या अभिनयाची सुंदर छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडतेय.
तिचे हे नवनवीन फोटो तिच्या चाहत्यांचं मन जिंकत आहेत. या पांढऱ्या गाऊनमधील फोटोंनी तर सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला.