आपण नेहमीच अनेक सुंदर तरुण-तरुणींना मॉडेलिंग करताना पाहतो. मात्र, तुम्हाला जर कुणी एक अस्वलही असंच मॉडेलिंग करतोय हे सांगितलं तर विश्वास बसेल का? काहीही असो हे फोटोज पाहून तुमचा यावर नक्की विश्वास बसेल.
Follow us
आपण नेहमीच अनेक सुंदर तरुण-तरुणींना मॉडेलिंग करताना पाहतो. मात्र, तुम्हाला जर कुणी एक अस्वलही असंच मॉडेलिंग करतोय हे सांगितलं तर विश्वास बसेल का? काहीही असो हे फोटोज पाहून तुमचा यावर नक्की विश्वास बसेल.
सध्या सोशल मीडियावर या अस्वलाचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
या मॉडेल अस्वलाचं नाव स्टीफन असं आहे. स्टीफन रशियात राहणारा 700 पाऊंडचा ‘ब्राउन बिअर’ आहे.
हे अस्वल माणसांसोबत खूपच फ्रेंडली आहे. ते माणूस करु शकणारी अनेक कामं सहजपणे करते. त्याचं वय 28 वर्षे आहे.
रशियातील फोटोग्राफर Mila Zhdanova ची या अस्वलावर नजर गेली.
स्टीफन अस्वलाच्या या कृती पाहून ती अवाक झाली. त्यानंतर तिने या अस्वलासोबत फोटो शूट करण्याचं प्लॅन केलं.
अस्वलाचे केअरटेकर्स Svetlana आणि Yuriy Panteenko सांगतात, की स्टीफनची आई त्याला लहानपणीच सोडून गेली. 3 वर्षांचा असल्यापासून स्टीफन माणसांच्या देखरेखीखाली वाढला. त्यामुळे त्याला माणसांची अजिबात भीती वाटत नाही.
स्टीफनच्या आवडीनिवडी आणि छंदही माणसांप्रमाणेच आहेत. तो मनोरंजन म्हणून टीव्ही देखील पाहतो. त्याला पाणी खेळायला देखील आवडते.
या अस्वलाच्या अनोख्या कृती पाहून Mila ने एका रशियाच्या मॉडेलसोबत त्याचे आऊटडोर शूट केले.
या फोटोशूटमध्ये अस्वलाचा मॉडेलसोबतचा सहज वावर अनेकांना अवाक करणारा आहे.
यानंतर Mila ने स्टीफन अस्वलाचे इतर अनेक मॉडेल्ससोबत देखील फोटोशूट केले आहे.